महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत अमानवी आणि काळजाचा ठाव घेणारी घटना समोर आली आहे. अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकल्या बाळाचं आयुष्य संपवण्यात आलं असून, हा गुन्हा कुणी बाहेरचा नव्हे तर जन्मदात्या पित्यानेच केल्याचं उघड झालं आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका गावात चौथीही मुलगी झाल्याच्या रागातून निर्दयी पित्याने अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच संतापाची लाट उसळली आहे. एका निष्पाप जीवाला समाजातील विकृत मानसिकतेचा बळी ठरावं लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पित्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मुलगी झाल्यामुळेच हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, ही घटना समाजातील स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींबाबतच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
Hashtags:
#JalgaonCrime #MaharashtraNews #GirlChild #CrimeNews #InhumanAct #SocialIssue #TirangaTimesMaharastra
